नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. दरम्यान यावेळी लाँच करण्यात आलेले बहुचर्चित ‘मुंबई वन’ (Mumbai One) ॲप गुरुवारी सकाळी अखेर लाईव्ह करण्यात आले. मात्र, या अॅपच्या लाँचनंतर लगेचच आयफोन वापरकर्त्यांची निराशा झाली कारण आयफोन वापरकर्त्यांना ते शोधून सापडत नाही.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार,” मुंबई वन’ हे अॅप Google Play Store आणि Apple App Store दोन्हीवर उपलब्ध आहे, मात्र आयफोन वापरकर्त्यांना ते शोधून सापडत नाही. पण चिंता करू नका आयफोन वापरकर्ते हे ॲप कसे डाऊनलोड करू शकतात हे जाणून घेऊ या
iOS वापरकर्ते ‘मुंबई वन’ अॅप कसे डाउनलोड करू शकतात?(How can iOS users Download The Mumbai One App?)
आयफोन वापरकर्ते खालील थेट लिंक वापरून हे अॅप डाउनलोड करू शकतात:
(https://apps.apple.com/in/app/mumbai-one/id6478221525)
लिंकवर क्लिक करून अॅप डाउनलोड केल्यानंतर, वापरकर्ते स्वतःची नोंदणी करून स्मार्ट ट्रान्सपोर्टची सुविधा सुरू करू शकतात.
‘मुंबई वन’ अॅपचे उद्दिष्ट आणि फीचर्स
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी विकसित केलेले हे अॅप शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक प्रणाली — मेट्रो, मोनोरेल, स्थानिक रेल्वे आणि बस सेवा — यांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवते.
मोनोरेल मेट्रो, ट्रेन, बस…प्रवास कोणताही असो अॅप एकच!
या अॅपद्वारे BEST, TMT, NMMT, KDMT यांसारख्या ११ वेगवेगळ्या ऑपरेटर्सचे QR आधारित तिकीट बुक करता येते. हे अॅप गुरुवारी पहाटे ५ वाजता सुरू झाले असून, सकाळी ११ वाजेपर्यंत Google Play Store वर याचे ५०० हून अधिक डाउनलोड्स झाले.
वापरकर्त्यांच्या तक्रारी
अॅप सध्या काही मर्यादांसह उपलब्ध आहे. आयफोनवर अॅप न दिसण्याव्यतिरिक्त, यामध्ये सध्या सीझन किंवा रिटर्न ट्रेन तिकिटे बुक करण्याची सुविधा नाही. तसेच नव्याने सुरू झालेल्या मेट्रो लाईन ३ (फेज २बी – वर्ली ते कफ परेड) साठी भाडे आणि मार्गाची माहिती अद्याप अपलोड केलेली नाही. त्यामुळे सध्या प्रवाशांना जुन्या पद्धतीने तिकिटे घ्यावी लागणार आहेत.
पंतप्रधान मोदींची काय म्हणाले?
लाँचिंग दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, “‘मुंबई वन’ हा भारतातील एकात्मिक आणि डिजिटल ट्रान्सपोर्टचा नवा अध्याय आहे. या अॅपमुळे मुंबईकरांना सर्व वाहतूक प्रणाली एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊन प्रवास अधिक सोपा आणि अखंड बनेल.”अॅपमध्ये कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स, रिअल-टाइम ट्रान्सपोर्ट अपडेट्स , तसेच मल्टी-मोडल जर्नी प्लॅनर सुविधा उपलब्ध आहेत.
तांत्रिक माहिती
हे अॅप MeitY-compliant Google Cloud Platform वर होस्ट करण्यात आले आहे आणि Kubernetes Engine द्वारा समर्थित आहे. MMRDA च्या मते, हे अॅप दररोज ५० लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे. तसेच वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.