मुंबई : स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कारावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. याबाबत मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मुलुंडच्या आरपी रोड परिसरात असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तेथे काही नेपाळी रहिवासी एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जमले होते. त्याचवेळी त्यांच्यात अंत्यसंस्कारावरून पहिल्यांदा काही शाब्दिक वाद झाला. बराच वेळ वाद सुरू असल्याने एका नागरिकाने त्याची माहिती मुलुंड पोलिसांना दिली. त्यानुसार काही वेळातच घटनास्थळी मुलुंड पोलिसांनी धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच अंत्यविधीसाठी आलेल्या दोन गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांनाच मारहाण केली.

हेही वाचा…मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल प्रकरणाला नवे वळण, ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमावाच्या या हल्ल्यात एक महिला पोलीस कर्मचारी आणि अन्य तीन कर्मचारी असे एकूण चार पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी त्यातील सहा जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले असून इतर आरोपींनी यावेळी पळ काढला. त्या सर्वांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.