मुंबई : पश्चिम उपनगरात कोकेन व एमडीएमए गोळ्या हा अमली पदार्थ विकणाऱ्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) पकडले. त्या तस्कराकडून एक कोटी ४३ लाख किंमतीचे कोकेन आणि तीन लाख ९० हजार किंमतीच्या एमडीएमए गोळ्या जप्त करण्यात आल्या.
जुहू येथील सेंट जोसेफ हायस्कूलजवळ अमलीपदार्थ तस्कर येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून ड्रग्स विकायला आलेल्या तस्करावर झडप घातली.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक कोटी ४३ लाख रुपये किंमतीचे १४३ ग्रॅम कोकेन आणि १३ ग्रॅम वजनाच्या करड्या व गुलाबी रंगाच्या एमडीएमए (एक्स्टसी) गोळ्या मिळाल्या. हे अमलीपदार्थ त्याने कुठून आणले व तो कोणाला विकणार होता याचा पोलिस अधिक तपास करत आहेत.