मुंबई : होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. गुरूवारी व शुक्रवारी असे दोन दिवस राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी १७ हजार ४९५ चलन जारी करण्यात आले. त्याद्वारे चालकांना एक कोटी ७९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.

होळी आणि धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर एकत्र येतात. या काळात काही ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत विशेष वाहतूक मोहीम (स्पेशल ड्राईव्ह) राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

दोन दिवसांच्या या विशेष मोहिमेत शहरात विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत दोन दिवसांमध्ये १८३ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. होळी आणि धुलीवंदनानिमित्त शहरात मद्यप्राशन करुन तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करुन वाहन चालविण्याच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी गुरूवारी संध्याकाळपासूनच विशेष मोहीम हाती घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांत नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून १७ हजार ४९४ चलन जारी करण्यात आले. त्यात दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल १८३ , विनाहेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल ४९४९, वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार हजार ६५४, सिग्नल तोडल्याबाबत १९४२ , ट्रीपल सीट दुचाकी चालवल्याबद्दल ४२५, नो एन्ट्रीमध्ये प्रवेश केल्याबाबत ९९२, विनाकारण हॉर्नचा वाजवणाल्याबाबत ४५, विरुद्ध दिशेने प्रवास केल्याबाबत ३३ चलन वाहतूक पोलिसांनी जारी केले.