लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शुक्रवारी दुपारी १२ ते २ दरम्यान पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या (किमी क्र. ५४/२२५) मार्गावर शुक्रवारी दुपारी १२ ते २ दरम्यान ग्रँटी बसविण्याचे काम हाती घेणार आहे. त्यामुळे या वेळत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.

आणखी वाचा-‘मेट्रो ३’च्या कामाचा फटका आता थेट मंत्रालयाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान खंडाळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून (किमी क्रमांक ४८/२००) पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर वळविण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केले. वाहनचालकांना वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरुन जाता येईल.