Mumbai Rain News Updates 29 may 2025 :मोसमी पाऊस बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा भागही मोसमी पावसाने व्यापला. त्याचबरोबर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापून मोसमी पाऊस पुढे सरकला आहे. तसेच,इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत बुधवारपर्यंत पुणे विभागातील ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या फेरीचे अर्ज भरण्यासाठी ३ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे यांनी ही माहिती दिली. शिक्षण विभागाने यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशा बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगरातील तसंच पुणे शहर – परिसर आणि नागपूरमधील विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Latest  News Updates, 29 may 2025

22:15 (IST) 29 May 2025

नुकसानग्रस्तांना दहा हजार रुपयांची मदत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, ही मदत तात्काळ मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...अधिक वाचा
22:01 (IST) 29 May 2025

फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुण्यात लष्करी गणवेश घालून फिरणाऱ्या व स्वतःला लष्करात शिपाई असल्याचे भासवणाऱ्या एका तरुणाविरोधात लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर वाचा
21:32 (IST) 29 May 2025

नीलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्तीसाठी हालचाली

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार सहआरोपी नीलेश चव्हाण याच्या मालमत्ता जप्तीसाठी पोलीस न्यायालयात गेले आहेत. चव्हाणने बाळाच्या मुद्यावरून पिस्तुल दाखवत धमकी दिल्याचा आरोप असून तो अद्याप फरार आहे. ...अधिक वाचा
21:18 (IST) 29 May 2025

हगवणे कुटुंबाने दोनदा लग्न मोडले, वैष्णवी हगवणे यांचे वडील अनिल कस्पटे यांचा आरोप

‘माझी मुलगी गेली, मुलीचे जिवंतपणी हाल झाले. मृत्यूनंतर तिची बदनामी करू नका. मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे वकिलाला शोभत नाही,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ...सविस्तर बातमी
21:05 (IST) 29 May 2025

राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा फज्जा, तूर खरेदी प्रक्रियेकडे शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ

केंद्र सरकारकडून देशभरात तुरीची हमीभावाने खरेदी केली जाते. राज्यात सुमारे शंभर दिवस तूर खरेदीची प्रक्रिया सुरू होती, तरीही तूर खरेदीचा फज्जा उडाला आहे. हमीभावापेक्षा खासगी बाजारात दर कमी असतानाही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. ...अधिक वाचा
20:58 (IST) 29 May 2025

महिला छात्रांची पहिली तुकडी पदवीधर,‘एनडीए’त ऐतिहासिक पदवी प्रदान सोहळा

कॅप्टन श्रिती दक्ष हिने कला शाखेत सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे सशस्त्र दलात प्रवेश करू इच्छिणाऱ्या हजारो मुलींना नवी प्रेरणा मिळाली आहे. ...अधिक वाचा
20:45 (IST) 29 May 2025

तापमान वाढ, उष्णतेच्या झळा कायम ? जागतिक हवामान संघटनेचा अंदाज काय

जगभरात गत दीड वर्षांपासून तापमान वाढीचा कल आहे.ही वाढ पुढील पाच वर्षे कायम राहील आणि औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत म्हणजेच सरासरीपेक्षा १.२ ते १.९ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होईल, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तविला आहे. ...सविस्तर वाचा
20:38 (IST) 29 May 2025

नरेंद्र मोदींना पत्र; नागपूर रेल्वे स्थानकाला ' या' राजांचे नाव देण्याची मागणी

नागपूरच्या राजे रघुजी भोसले यांची २१ वर्षांच्या पराक्रमी कारकीर्द होती. अशा पराक्रमी महायोद्धाचे नागपूर रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे, अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. ...वाचा सविस्तर
19:15 (IST) 29 May 2025

अंबरनाथमधून १ हजार ४५० किलो गोमांस जप्त, १३ जणांवर गुन्हा, सात जणांना अटक, अंबरनाथ पोलिसांची कारवाई

अंबरनाथ शहरातील पश्चिमेच्या वुलन चाळ भागातून ९ मास विक्री दुकानांमधून सुमारे १ हजार ४५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
19:08 (IST) 29 May 2025

चौथ्या दिवशीही अकरावी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ कायम; लॉगिन आयडी, पासवर्डचे संदेशच येत नसल्याने विद्यार्थी हैराण

तांत्रिक बिघाडानंतर सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेला लागलेले तांत्रिक ग्रहण चौथ्या दिवशी कायम होते. अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून दररोज साधारण दोन लाख विद्यार्थी अर्ज भरत आहेत. ...सविस्तर वाचा
18:55 (IST) 29 May 2025

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला, वेतन बंदीला स्थगिती

समायोजनास नकार दिलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतनही थांबवण्यात आले होते. यासंदर्भात विविध शिक्षण संघटनांनी शिक्षक संचालकांशी चर्चा केल्यानंतर शिक्षण संचालकांनी संचमान्यता, समायोजन आणि वेतन बंदीला स्थगिती देण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत. ...सविस्तर बातमी
18:32 (IST) 29 May 2025

भायखळ्यात इमारतीचा सज्जा कोसळून दोन महिला जखमी, एकीची प्रकृती गंभीर

भायखळा पश्चिम येथील बदलू रामगरी मार्गावरील अशरफी मंजिल या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जाचा काही भाग बुधवारी सायंकाळी कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. ...सविस्तर बातमी
18:11 (IST) 29 May 2025

मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांच्या विरोधात शिक्षक करणार जेलभरो आंदोलन

मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांच्या विरोधात मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने १३ जून २०२५ रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
17:36 (IST) 29 May 2025

रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही नसल्याने टीसी आणि प्रवाशामधील वादाबाबत आरोप प्रत्यारोप

याबाबत दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असला तरी पालघर रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नक्की चुकी कोणाची याचा उलगडा होऊ शकला नाही. ...अधिक वाचा
16:45 (IST) 29 May 2025

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्नातील तरुण ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील वर्षा या शासकीय बंगल्यासमोर सोलापूर येथील रहिवासी बुधवारी आत्मदहनासाठी आला होता. पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ...सविस्तर वाचा
16:45 (IST) 29 May 2025

कल्पकतेने काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे कामही शास्त्रज्ञांइतकेच मोठे;‌ कृषी विद्यापीठांनी अशांना मानद कृषी संशोधक म्हणून गौरविण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

प्रत्येक विद्यापीठाने दरवर्षी पाच शेतकऱ्यांचा या पद्धतीने गौरव करावा व त्यांचे कार्य सर्व शेतकऱ्यांसमोर आणावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ...सविस्तर बातमी
16:19 (IST) 29 May 2025

मिरा रोड येथे नागरी वस्तीत सिलेंडरचा स्फोट, आगीत आठ ते दहा झोपड्या जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. ...वाचा सविस्तर
16:11 (IST) 29 May 2025

डोंंबिवलीतील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे निधन

डोंबिवली येथील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...अधिक वाचा
15:09 (IST) 29 May 2025

कल्याण शिळफाटा रस्त्यावर चक्कीनाका येथे भुयारी गटाराचे झाकण तुटल्याने वाढते अपघात

कल्याण शिळफाटा रस्त्यावर महिनाभरापासून खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. मागील पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून दुचाकी स्वार पडण्याच्या, वाहने आपटण्याच्या घटना वाढत आहेत. ...सविस्तर वाचा
15:02 (IST) 29 May 2025

‍शिक्षिका बनली सैतान! शिक्षक पतीचा खून करणाऱ्या निधीची पात्रता नसतानाही मुख्याध्यापिकापदी नियुक्ती…

यवतमाळ येथील बहुचर्चित शिक्षक पती हत्याकांडातील आरोपी पत्नी मुख्याध्यापिकेची शैक्षणिक अर्हता नसतानाही या पदावर तिची नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपासात पुढे आली. ...सविस्तर बातमी
13:19 (IST) 29 May 2025

लाचखोरीप्रकरणी कनिष्ठ पारपत्र सहाय्यकासह दोघांना अटक; मुंबईत सीबीआयची कारवाई

बनावट कागदपत्रांवर आधारित पारपत्र काढून देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. आरोपींनी अनेक पारपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवल्याचा आरोप आहे. ...अधिक वाचा
13:15 (IST) 29 May 2025

अंधेरीत पालिकेच्या घनकचरा वाहनाची धडक, डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

या अपघात प्रकरणी अंधेरी पोलिसांनी घनकचरा वाहनचालकाला अटक केली आहे. ...सविस्तर वाचा
12:59 (IST) 29 May 2025

जेएन.१ चे उत्परिवर्तन करोना वाढीस कारणीभूत

जेएन.१ विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे तयार झालेले एनबी.१.८.१ आणि एलएफ.७ हे करोनाचे नवीन उपप्रकार कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही एनबी.१.८.१ या उपप्रकाराबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
12:21 (IST) 29 May 2025

अमेरिकन डॉलरच्या ऐवजी कोर्‍या कागदांचे बंडल; फसवणूक करणार्‍याला जेजूरीतून अटक

पोलीस आपल्याला पकडणार हे ठाऊक असतानाही त्याने लपून राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. अखेर नागपाडा पोलिसांनी त्याला जेजुरी येथून अटक केले. ...सविस्तर बातमी
11:55 (IST) 29 May 2025

श्रीखंडासाठी आठ रुपये अधिक घेणाऱ्या दुकानदाराला १५ हजार रुपयांचा भूर्दंड 

श्रीखंड खरेदी करणार्‍या ग्राहकाकडून आठ रुपये अधिक घेणे संबंधित दुकानदारास महागात पडले. ...सविस्तर वाचा
11:43 (IST) 29 May 2025

जळगावात भाजप- अजित पवार गटातील घाऊक प्रवेशांमुळे शिंदे गटाची कोंडी

जिल्ह्यात भाजपसह राष्ट्रवादीने (अजित पवार) महाविकास आघाडीचे मोठे मोहरे गळाला लावून घाऊक पक्ष प्रवेश एका पाठोपाठ घडवून आणले. ...सविस्तर बातमी
11:39 (IST) 29 May 2025

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांचा कचरा शुल्क वाढीला विरोध, कर रद्द न केल्यास लोकप्रतिनिधींकडून पालिकेला आंदोलनाचे इशारे

शिंदे, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी, काही जागरूक नागरिकांनी पालिकेला पत्र लिहून ही कचरा शुल्क वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. ...वाचा सविस्तर
11:27 (IST) 29 May 2025

जिल्ह्यात अद्याप वळीवाचाच पाऊस; शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करावी, पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचा सल्ला

राज्यात सर्वत्र पावसाला धुवाधार सुरुवात झाली आहे. मोसमी पाऊस मुंबई पर्यंत दाखल झाला असून जिल्ह्यात मात्र अद्याप पूर्व मान्सून (वळीवाचा) पाऊस आहे. ...सविस्तर बातमी
11:24 (IST) 29 May 2025

पालघरचा पाणी प्रश्न पेटला; आमदारांच्या भूमिकेमुळे माजी नगरसेवक विरुद्ध सरपंच अशी रंगत

पालघर आणि २६ गावाच्या नळ पाणी योजनेतून पडघे आणि १९ गावांची नळपाणी योजना अंतर्गत करण्याच्या आमदार राजेंद्र गावित यांच्या पाठिंबामुळे पालघरचे माजी नगरसेवक व या १९ गावांचे सरपंच अशी लढत निर्माण झाली आहे. ...सविस्तर बातमी
11:09 (IST) 29 May 2025

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील तीनपैकी एकच तिकीट खिडकी उघडी, प्रवाशांकडून नाराजी

सकाळच्या वेळेतील प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन या भागातील किमान तीन तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात याव्यात, अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे. ...वाचा सविस्तर

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे