मध्य रेल्वे कधी- रविवारी, ५ जून, सकाळी ११.४५ ते दुपारी ३.४५ कुठे- मुलुंड- माटुंगा अप जलद मार्गावर परिणाम- सकाळी ११.२२ ते दुपारी ३.२८ या वेळेत ठाणेहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सर्व सेवा मुलुंड-परळ स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. हार्बर रेल्वे कुठे-पनवेल-बेलापूर अप आणि डाऊन, सकाळी ११.०० ते ४.०० परिणाम- सकाळी १०.५६ ते सायं. ४.१५ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पनवेलला अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.१७ ते दुपारी २.५९ या काळात पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी सेवा बंद राहणार आहे. सकाळी ११.०४ ते दुपारी ३.४५ या वेळेत ठाणेहून सुटणारी अप ट्रान्सहार्बर सेवा सकाळी १०.०० ते दुपारी २.५२ या वेळेत ठाणे ते पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर सेवा बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वे कधी-१०.३५ ते ३.३५ कुठे-सांताक्रुज आणि गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर परिणाम- ब्लॉक काळात डाऊन जलद मार्गावरील अंधेरी तसेच बोरिवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे.