Mumbai Railway Officer Atul Mone Died in Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात देशविदेशातील पर्यटकांवर मंगळवारी हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे अधिकारी अतुल मोने यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कारखान्यात वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) पदावर अतुल मोने कार्यरत होते.

मोने हे डोंबिवली पश्चिमेला राहत होते. सुट्टीनिमित्तानेते कुटूंबियांसह जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेले होते. परंतु, दहशतीवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या राहत्या सोसायटीत ही वार्ता पसरल्यानंतर, सर्व रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला. तसेच, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले असून या हल्ल्यातील जखमींना अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकार आणि गृह मंत्रालय मदत व्यवस्था करत असून रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीसाठी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. एनआर जम्मू/फिरोजपूर विभागांना स्थानिक परिस्थितीत शक्य तितक्या लवकर शक्य तितकी मदत मिळावी, यासाठी कळवले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.