मुंबई / पुणे : मुंबई आणि कोकण वगळता राज्यभरात दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात १५ अंश सेल्सिअसच्या आसपास तफावत दिसत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी सुखावणारा गारवा आणि दुपारनंतर अंगाची काहिली असा अनुभव नागरिकांना येत असून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईत ६ ऑक्टोबरपासून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर आता शहर आणि उपनगरांत ऑक्टोबरमधील उकाडय़ाचा प्रभाव जाणवू लागला आहे.

हेही वाचा >>> २,७०० लोकल फेऱ्या रद्द, ४०० फेऱ्या अंशत: रद्द; पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेसाठी २९ दिवसांचा मोठा ब्लॉक

पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, उपनगरांत पारा ३२ अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झाले  आहेत. पुढील काही दिवस मुंबई शहर व उपनगरांत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट दिसून येईल. १२ ऑक्टोबपर्यंत मुंबईतील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.