मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरात, तसेच रेल्वे प्रवासात घातपात, अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते. परंतु, काही वेळा बॅग तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार केला जात होता. अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची बॅगांची तपासणी करणाऱ्या रेल्वे पोलिसांवरच आता वरिष्ठांतर्फे देखरेख ठेवली जाणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बॅग तपासणीच्या कार्यपद्धतीचे उल्लंघन करून प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार घडत आहेत. विशिष्ट कार्यपद्धतीचे पालन करून बॅग तपासणी करणे आवश्यक आहे. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अशा गैरप्रकारांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही रेल्वे पोलिस बॅगांची तपासणी करताना नियमांचे उल्लंघन करीतच आहे. तंबाखूजन्य पदार्थ, विदेशी चलन, मौल्यवान वस्तूंची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांची लूट केली जाते. असे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने बॅग तपासणीच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत. याशिवाय, बॅग तपासणीबाबत रवींद्र शिसवे यांनी नुकतेच सूचनापत्रही काढले. त्यानुसार, बॅग तपासणी करणाऱ्या पोलिसांच्या नावाची यादी, १ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली हे तपासले जाणार आहे.

हेही वाचा…‘कनेक्शन इंडिया फेस्टिव्हल’साठी महानगरपालिकेच्या सहा शाळांची निवड, शालेय विद्यार्थ्यांना रंगमंचाची ओळख होणार

बॅग तपासणीचे नियम

रेल्वे स्थानक आणि परिसरातील संशयास्पद रेल्वे प्रवाशांची बॅग तपासण्यात येते.

कर्तव्यावरील पोलीस अधिकारीच्या समक्ष प्रवाशांच्या बॅग तपासणी करावी. हे सर्वजण वर्दीत असावेत.

‘बॅग चेकिंग ड्युटी’ असे ठळक लिहिलेले ओळखपत्र गळ्यात असावे.

सीसी टीव्हीच्या देखरेखीखाली प्रवाशांची बॅग तपासावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांकडे बेकायदेशीर वस्तू आढळल्यास त्यासंदर्भातील सर्व माहिती पोलीस अधिकाऱ्यांना कळवावी आणि स्वतंत्र प्रमाणित केलेल्या नोंदवहीत त्याची नोंद करावी.