हिंगोली येथे हत्येचा गुन्हा दाखल झालेल्या दोन पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस शिपाई श्याम कुरील व प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई तुलजेश कुरील अशी सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. दोन्ही पोलीस विभागीय चौकशीत दोषी आढळल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हिंगोली येथे २०१७ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी बडतर्फ दोन पोलिसांसह एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हिंगोली शहर येथील रोहिदास चौक येथे जितेंद्र कुरील या तरूणाची २०१७ मध्ये हत्या झाली होती. याप्रकरणी श्याम व तुलशेज यांच्यासह १८ जणांविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्याम व तुलशेज दोघेही सशस्त्र पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या विभागीय चौकशीत दोघे दोषी आढळल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहिहंडीच्या आयोजनावरून १७ ऑगस्ट २०१७ ला झालेल्या वादतून जितेंद्र कुरील याची हत्या झाली होती. डोक्यात टणक वस्तूने मारल्यामुळे तसेच पोटात गुप्त घुसवून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी दंगल, हत्येचा प्रयत्न व हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या हल्ल्यात आणखी काही जण जखमी झाले होते. मृत जितेंद्र याचा भाऊ विजय हाही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. बडतर्फ करण्यात आलेल्या दोन्ही पोलिसांचा हत्येत सहभागी होते. तक्रारीनुसार श्याम कुरील याने गुप्तीने जितेंद्रवर वार केले होते व तुलजेश याने लोखंडी वस्तूने जितेंद्रच्या डोक्यात मारले होते, असा आरोप होता. त्याप्रकरणी एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी दोन्ही पोलिसांसह सर्व १८ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. करोना काळात त्या सर्वांना जामीन मिळाला होता.