मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नारळी पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठातर्फे निर्गमित केले जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. आज नियोजित वेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) आणि एम.एड., तर दुपारच्या सत्रात एम.ए. आणि एम.कॉम.च्या परीक्षा होत्या.