लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ३०५ रहिवाशांना बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत शुक्रवारी पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची हमी देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने शुक्रवारी सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सोडतीला रहिवाशीच उपस्थित न राहिले नाहीत. त्यामुळे सोडत रद्द करण्याची नामुष्की मुंबई मंडळावर ओढवली. आता मंगळवार, १४ मे रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे रहिवाशांना कोणत्या पुनर्वसित इमारतीत आणि कोणत्या मजल्या, किती क्रमांकाचे घर मिळणार हे निश्चित करण्यात येणार आहे.

वरळी, ना. म.जोशी मार्ग आणि नायगाव या तीन बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाचे मुंबई मंडळ करीत आहे. या तिन्ही चाळींतील रहिवाशांची पात्रता निश्चिती करून रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येत आहे. आतापर्यंत या तिन्ही चाळींतील अनेक रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे घराची हमी देत त्यांचा संक्रमण शिबिरात हलविण्यात आले आहे.

आणखी वाचा-मुंबई : सर्व्हर डाऊन झाल्याने सीईटी परीक्षेत गोंधळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ना. म. जोशी मार्ग येथील इमारत क्रमांक ७, ८, ९ आणि १० मधील ३०५ रहिवाशांना घराची हमी देण्यासाठी शुक्रवारी मुंबई मंडळाने सोडत काढण्याची तयारी केली होती. मात्र या सोडतीला रहिवासी अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही सोडत रद्द करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता ही सोडत मंगळवार, १४ मे रोजी काढण्यात येणार आहे. सोडतीसंदर्भातील पत्र रहिवाशांना पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, रहिवासी या सोडतीला उपस्थित का राहिले नाहीत याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.