केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडून ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनची किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे. या मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये एका दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई विमानतळावरुन या व्यक्तीला अटक केली. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येऊन मुंबईत आलीय. या व्यक्तीकडे असणाऱ्या ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेमध्ये चार पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या बॅगमध्ये एका गुप्त कप्प्यामध्ये लपवण्यात आलेल्या असं एनसीबीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. बॅगाचा पुढील भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या सापडल्या.

मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये एनसीबीने दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे ३.९ किलो हेरॉइन सापडलं होतं, असं एनसीबीने म्हटलंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb seizes heroin worth rs 24 cr from south african national at mumbai airport scsg
First published on: 14-04-2022 at 12:27 IST