मुंबई : ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर ११५ प्रवाशांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत. त्यात एक पुरूष व एका लहान मुलाचा समावेश आहे. त्याच्या शोधासाठी नौदल व तटरक्षक दलाने गुरूवारी सकाळीही शोध मोहीम राबवली.

‘नीलकमल’ प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्यामुळे बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण ११५ जणांना वाचवण्यात आले. यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ९७ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

हे ही वाचा… रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार, अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हे ही वाचा… मुंबई : चालू आर्थिक वर्षात ११ हजार मांजरांच्या निर्बीजीकरणाचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात ७५, नेव्हल डॉकयार्डमध्ये २५, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे १२, तर मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले आहे. नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, अद्याप दोन प्रवासी बेपत्ता असून त्यात एक पुरूष व लहान मुलाचा समावेश आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व हेलिकॉप्टर तैना करण्यात आले आहे.