मुंबई : राष्ट्रीय अस्मिता, प्रगती आणि एकात्मिता यांचे दर्शन घडविणारा ‘रशिया दिन’ १२ जून रोजी असून यानिमित्ताने रशियन सरकारच्या अनेक विद्यापीठांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तींची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या शैक्षणिक घोषणेमुळे भारतातून रशियामध्ये वैद्यकीय पदवी शिक्षण घेण्यास सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. या शिष्यवृत्तींसंदर्भात ‘एड्युरशिया’कडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रशिया दिनाच्या निमित्ताने रशिया आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन परस्परसंबंधही अधोरेखित होतात. शिष्यवृत्तींसंदर्भातील घोषणेमुळे भारतीय विद्यार्थ्यांना किफायतशीर, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण प्राप्त होणार आहे. सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तीसाठी आणि आपल्या आवडीच्या विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन ‘एड्युरशिया’कडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी apply@edurussia.in या ई – मेल आयडीवर किंवा मोबाइल क्रमांक ९७६९७६१०९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एडयुरशिया’चे प्रतिनिधी मनोज पत्की यांनी केले आहे.
विविध रशियन सरकारी विद्यापीठांकडून शैक्षणिक गुणवत्ता, प्रवेश परीक्षेतील गुण आणि कामगिरी निर्देशांक तपासून शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रत्येक संस्थेत मर्यादित प्रवेश असल्याने विविध रशियन विद्यापीठे शिक्षण शुल्क व तत्सम शुल्कांवर सवलत देत असून हे प्रमाण २० ते १०० टक्के एवढे आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. रशियन सरकारच्या विद्यापीठांसाठी भारतातील अधिकृत प्रवेश भागीदार म्हणून ‘एड्युरशिया’ या संस्थेची ओळख आहे. रशियन संघराज्य कौन्सुलेट जनरल (वाणिज्य दुतावास) यांनी ही निवड मंजूर केलेली आहे. या संस्थेने गेल्या २५ वर्षांमध्ये हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे रशियातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश केले आहेत.