‘बहुजन हिताय’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेत या प्रकरणी चौकशी करून याचिकेतील आरोपांत तथ्य आढळल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारला दिले. दिलीप अलोनी यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्या. अजय खानविलकर आणि न्या.अशोक भंगाळे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.  या देशात केवळ बौद्ध व जैन धर्मच होता, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच लोकमान्य टिळकांनी पहिली जातीय दंगल भडकवली, असेही पुस्तकात म्हटले आहे. यामुळे या पुस्तकाच्या प्रती जप्त कराव्यात व पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम खेडेकर, प्रकाश कडू यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.