उपनगरीय रेल्वेच्या लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या बहुप्रतीक्षित परळ टर्मिनसच्या कामाला येत्या जून महिन्यापासून सुरुवात होणार आहे. सध्या निविदा प्रक्रियेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात असून त्या एक-दीड महिन्यात पूर्ण झाल्यानंतर तातडीने परळ टर्मिनसचे काम हाती घेतले जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यात तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पूलावर हातोडा पडणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
मध्य रेल्वेच्या एमयुटीपी-२ अंतर्गत परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या निविदा प्रक्रियाच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. एक ते दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे सर्वसाधारण पावसाळ्यापूर्वी परळ टर्मिनसच्या फलाटांचे काम हाती घेतले जाईल. मात्र या कामादरम्यान दादरच्या दिशेला असणाऱ्या तीन कोटी रुपये किंमतीच्या पादचारी पूलावर हातोडा पाडणार आहे.