लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्याकडे २५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. भूषण दायमा (४०) आणि रमेश बतकळस (४६) अशी अटक पोलिसांची नावे असून दोघेही मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

काही दिवसांपूर्वी तक्रारदाराविरूद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भूषण दायमा करीत होते. या गुन्ह्यात तक्रारदारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायाल्याने त्याचा जमीन नाकारला होता. त्यामुळे दायमा याने आरोपीला अटकेची भीती दाखवून, तसेच गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्यासाठी त्याच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली.

हेही वाचा… पर्यावरण संवर्धनासाठी सौरऊर्जा प्रकल्पावर भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून दोन लाख रुपये स्वीकारताना भूषण दायमा याच्यासह पोलीस शिपाई रमेश बतकळस याना रंगेहात पकडले.