राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार रवींद्र फाटक, महादेव जानकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात ज्या ठिकाणी अमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असेल, त्या ठिकाणी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असे सांगून गृहमंत्री देशमुख म्हणाले की, ठाणे जिल्ह्य़ात अमली पदार्थविरोधी पथकाने ११ ठिकाणी छापे टाकून ४२ लोकांवर कारवाई केली आहे.

वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व करोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत गर्दीमध्ये लावलेली उपस्थिती व तेथे करोना नियमांचे झालेले उल्लंघन, यासंदर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधान परिषद सदस्य रामदास कदम, भाई जगताप, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officers responsible if hookah parlor operates abn
First published on: 03-03-2021 at 00:22 IST