मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावरही दिसून आले होत. दरम्यान, ठाकरे गटाशी युती करण्यासंदर्भात वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमागी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहूजन आघाडीची आज दादरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

हेही वाचा – ‘ही’ शक्कल केवळ राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही, या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? – उद्धव ठाकरे

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, अधिकृतरित्या दोघांकडून आम्हाला काहीही उत्तर मिळालेलं नाही. निश्चितपणे उद्धव ठाकरेंबरोबर एक कार्यक्रम झाला होता. मात्र, तो अराजकीय होता. त्यामुळे आता ज्या ग्रामंपचायतीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका आम्ही स्वत:चे पॅनल उभे करून लढतो आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

हेही वाचा – “ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच दाखवला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकाकारांना प्रत्युत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीही युतीचे संकेत

दरम्यान, यापूर्वी प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीही युतीचे संकेत दिले होते. “राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर सर्व अवलंबून आहे. ताबोडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ”, असे ते म्हणाले होते.