लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरातील रस्त्यावर शुक्रवारी अनेक नवीन वाहने दिसून आली. यंदा १ ते १० मे या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांतील मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चार आरटीओमधून तब्बल ५,८६१ वाहनांची नोंदणी झाली. यात ३,८०० दुचाकी आणि २,०६१ चारचाकींचा समावेश आहे.

अक्षय्य तृतीयेच्यानिमित्ताने गेल्या १० दिवसांपासून वाहन खरेदी, नोंदणी सुरू होती. मुंबईत बोरिवली आरटीओमध्ये सर्वाधिक चारचाकी वाहनांची नोंदणी झाली. या आरटीओमधून ६१८ चारचाकी आणि १,०१३ दुचाकीची नोंदणी झाली. तर वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. वडाळा आरटीओत १,०६७ दुचाकी आणि ४५३ चारचाकी वाहनांची नोंद झाली.

आणखी वाचा-विधानसभेतील सरकारच्या आश्वासनांच्या अंमलबजावणीचे आदेश देऊ शकत नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

वडाळा आरटीओ

चारचाकी – ४५३
दुचाकी – १,०६७

मुंबई सेंट्रल आरटीओ

चारचाकी – ४९८
दुचाकी – १,०१८

अंधेरी आरटीओ

चारचाकी – ४९२
दुचाकी – ७३२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोरिवली आरटीओ

चारचाकी – ६१८
दुचाकी – १,०१३