स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांच्या विरोधात दाखल झालेल्या हुंडाबळीच्या गुन्ह्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी रविवारी समन्स बजावले आहे. आता त्यांना चार दिवसांच्या आत कांदिवली पोलीस ठाण्यात हरज राहावे लागणार आहे. सासरच्या कुटुंबियांकडून आपला शारिरीक आणि मानसिक छळ होत असून त्याला आध्यात्मिक धर्मगुरू सुखविंदर कौर उर्फ राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निक्की गुप्ता या विवाहितेने केला होता. निक्की हिने दिलेल्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी नुकतीच राधे माँसह सात जणांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.