मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध आभियांत्रिक आणि देखभाल – दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लाॅकमुळे अनेक लांबपल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ब्लाॅक काळात लोकल विलंबाने धावणार आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : खड्डे आणि पावसामुळे पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्गाची कोंडी

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका

कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळ ९.५० ची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. ही मेमू कोपर – दिव्यादरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच ही मेमू दिव्यावरून न सुटता, सकाळी ११.४५ वाजता कोपर ते वसई रोडदरम्यान धावणार आहे.

हेही वाचा >>> पावसात तुमचा बॉस ऑफिसला बोलवत असेल तर ‘हा’ Video पाठवाच; मुंबई लोकलचा प्रवास खाऊ नाहीच!

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत पनवेलवरून सीएसएमटीला जाणारी आणि सीएसएमटीवरून पनवेल / बेलापूरला जाणारी लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. पनवेल – ठाणे आणि ठाणे – पनवेल / बेलापूर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी – सीएसएमटीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ठाणे – वाशी / नेरुळ स्थानक लोकल सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपरदरम्यान लोकल सेवा सुरु असेल.

हेही वाचा >>> वैमानिक मुलीचं कौतुक करताना शरद पोंक्षेंकडून आरक्षणाचा उल्लेख, काँग्रेस नेते म्हणाले, “या विकृत माणसाने…”

पश्चिम मार्ग

कुठे : मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील लोकल मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे जलद मार्गाचे फलाट उपलब्ध नसल्याने या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. लोअर परळ आणि माहीम येथे कमी लांबीचे फलाट असल्याने दोनदा लोकल थांबा घेईल. तसेच या ब्लॉककालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.