मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ ठेऊनही त्यावर चर्चा होत नसल्यावर नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी एवढे प्रयत्न करूनही लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नावरही आपली भावना व्यक्त केली. तसेच प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान आणि सलमान खानचं नाव घेत राजकीय टोलेबाजी केली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले, “अपेक्षित मतदान झालं नाही की मला राग येत नाही, मात्र वाईट वाटतं. वाईट या गोष्टीचं वाटतं की, एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही जर पदरात काही पडत नसेल तर वाईट वाटतं. कारण त्यामागे फार विचार असतो, मेहनत असते.”

“आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही”

“आमचं शाहरूख खान, सलमान खानसारखं नाही. त्यांचा एक चित्रपट पडला तर लगेच दुसरा सुरू करू शकतात. मात्र, आमचं असं नाही. आमचा एक चित्रपट संपला की लगेच सुरू करता येत नाही. आमचा पाच वर्षांनीच सुरू होतो. हे आमच्या हातात नसल्यामुळे पुन्हा ती पाच-पाच वर्षे जातात,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीने काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“महाराष्ट्राने लवकरात लवकर ती गोष्ट हातात द्यावी”

“एक उमेदीचं वय असतं, उमेदीचा काळ असतो. तुम्हाला या राज्यासाठी काही तरी नवीन करून दाखवावं वाटत असतं. माझी ती इच्छा, आशा, आकांक्षा आहे. आमची सर्वांचीच आहे. महाराष्ट्राने लवकरात लवकर ती गोष्ट हातात द्यावी,” अशी आशाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray mention shahrukh khan salman khan while talking on politics in maharashtra pbs
First published on: 24-01-2023 at 14:32 IST