मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण च्या सदस्यपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजगोपाल देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विकासकांकडून घर खरेदीमध्ये लोकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र शासनाने मार्च २०१६पासून देशभरात स्थावर संपदा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार एखाद्या विकासकाने फसवणूक केल्यास घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला राज्य स्थावर संपदा प्राधिकरणाकडे (महारेरा) तसेच दाद मागता येथे.
तेथेही न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरणाकडेही न्याय मागता येतो. यासाठी स्थापना केली आहे. या न्यायाधिकरणावरील सदस्य के. शिवाजी यांचा ३०जून रोजी कार्यकाल संपला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायाधिकरणच्या सदस्यपदी नियोजन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावरून काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या राजगोपाल देवरा यांची नियुक्ती केली आहे. गृहनिर्माण विभागाने याबाबतचे आदेश शुक्रवारी निर्गमित केले. देवरा यांनी यापूर्वी वित्त, नियोजन,सहकार, आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून काम केले आहे.