गती देण्याची रावसाहेब दानवे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

मुंबई : राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन न झाल्याने काम रखडले असून भूसंपादन आणि एकू णच  प्रकल्पाच्या कामाला गती द्या, अशा सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉपरेरेशन, पश्चिम रेल्वे आणि राज्य सरकारच्या उपस्थित प्रतिनिधींना बुधवारी झालेल्या बैठकीत दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही लवकरच भेट घेणार असल्याची माहिती दानवे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. यावेळी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका निर्मितीच्या डेडिके टेड फ्र ेट कॉरीडोर प्रकल्पाचीदेखील माहिती घेऊन त्यांनाही गती देण्याचे आदेश दिले.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि मुंबई उपनगरीय रेल्वेवरील एकू ण ४३०.३७ हेक्टर जमीन लागणार आहे. आतापर्यंत १२९ हेक्टर भूसंपादनच झाले आहे.

रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. बुलेट ट्रेन प्रकल्प, पश्चिम रेल्वेचा डेडिके टेड फ्र ेट कॉरीडोरसह अन्य प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेताना भूसंपादनात येणाऱ्या अडचणी, प्रकल्प राबवताना बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन याची माहिती बुधवारी झालेल्या बैठकीत घेतली. यासंदर्भात लोकसत्ताला माहिती देताना दानवे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडचणी समजून घेण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्हाधिकारी, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक, नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉपरेरेशन आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतल्याचे सांगितले.

* मुंबई-पुणे-हैद्राबाद आणि मुंबई-नाशिक-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही आढावा रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतला.

* भूसंपादन, अंदाजपत्रक इत्यादीची माहिती त्यांनी घेतली व ही कामेही वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्यातील ठाणे जिल्ह्य़ातील १४१.३२ हेक्टरपैकी ७९.८९ हेक्टर, पालघर जिल्ह्य़ातील २८४.२३ हेक्टरपैकी ४९.१४ हेक्टर भूसंपादन झाले आहे. तर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आवश्यक असणाऱ्या ४.८२ हेक्टरपैकी काहीच जमीन संपादित झालेली नाही.