लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: हिंदी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनित सिंह राजपूतविरोधात एका २३ वर्षीय अभिनेत्रीने बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने पुनितवर (२६) बलात्काराचे आरोप केले होते. आता त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुनितने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.
आणखी वाचा-समृद्धी महामार्ग अपघात: महामार्गाच्या पूर्णत्वास विलंब होणार नाही- एमएसआरडीसी
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी पुनित सिंग राजपूत विरोधात ३७६, ३७७ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मूळचा गुजरातमधील सूरत येथील रहिवासी असून आरोपीने वनराई पोलिसांच्या हद्दीत हा प्रकार केल्यामुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
