मुंबई : समस्या आणि संकटांशी एकत्रित लढण्याची ऊर्मी माणसांकडे निश्चितपणे होती, पण आज तसे राहिलेले नाही… आजची समस्या अशी की, जे सशक्त आहेत – मग ते देश असोत, नेते असोत – तेच स्वत:ला ‘बळी’ म्हणवण्यात गर्क आहेत आणि एकदा का हे ‘बळी’चे कथन लोकांच्या गळी उतरले की आपापली जबाबदारी झटकता येते, असे भाष्य लोकप्रिय इतिहासकार युवाल नोआ हरारी यांनी शनिवारी येथील प्रकट मुलाखतीत केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा धोका मानवजातीला निवारता येणारा नसेल, असे प्रतिपादन करणाऱ्या ‘नेक्सस’ या नव्या पुस्तकाच्या प्रसिद्धी-दौऱ्यासाठी हरारी मुंबईत आले. येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या हिरवळीवर त्यांची मुलाखत अभिनेता आमिर खान आणि जसलोक रुग्णालयाचे संशोधन विभाग प्रमुख व मेंदू-अभ्यासक डॉ. राजेश एम. पारीख यांनी घेतली. ‘एआय’ला लगाम घालता येईल, अशा मताची पुष्टी करणारे प्रश्न डॉ. पारीख यांनी विचारले. तेव्हा हा लगाम घालणार कोण, असा प्रतिप्रश्न करताना ‘जबाबदार नेते नाहीत’ हेच सूचकपणे सांगितले. हरारी इस्रायलचे; त्यामुळे सध्याच्या बेलगाम संघर्षाबद्दल त्यांनी मतप्रदर्शन करावे अशी विवेकीजनांची अपेक्षा होतीच.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

हेही वाचा >>>देशभरातून हिमोफिलिया रुग्णांची उपचारासाठी महाराष्ट्रात धाव! हिमोफिलिया रुग्णांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालय आधारवड

पण इस्रायलचा नामोल्लेख त्यांनी एकदाच- तोही ‘कोणत्या जागा म्हणजे हमास संघटनेचे अड्डे आहेत, हे ‘एआय’च्या मदतीने ठरवले गेल्याचे मी ऐकले आहे’- इतकाच केला. त्यांचा मुद्दा होता तो ‘एआयमुळे मानवाचे स्वत्व हरवेल,’ हा. त्याच्या समर्थनार्थ त्यांनी पुस्तकातले दाखले दिलेच, पण ‘निर्णय एआयवर सोपवले जातील आणि मानवी तारतम्य हरवेल’ ही स्वत्व हरवण्याआधीची स्थिती झपाट्याने का येते आहे, याविषयी जाहीर भाष्य करण्याची संधी त्यांनी घेतली. ‘मीच पहिला’, ‘आमचाच देश पहिला’ या महत्त्वाकांक्षांना जबाबदारीची जोड नसल्याचे दिसत असूनही लोक गप्प आहेत, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की ‘एआय’ची क्षमता आणि व्याप्ती सध्या अमीबाइतकीच असेल; पण आपण हे असेच राहिलो तर, या दहाएक वर्षांत या अमीबाचा महाकाय डायनोसॉर आपल्यापुढे फुत्कारत उभा राहील!

Story img Loader