scorecardresearch

“उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर…”, संजय शिरसाट यांचं विधान

“सकाळची शपथ घेण्याची संधी मिळणार नाही, याचं…”

sanjay shirsat
"उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर…", संजय शिरसाट यांचं विधान

२०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून दुरावा आला. यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडी उदयाला आली. पण, अलीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडत भाजपाबरोबर सत्तास्थापन केली. मात्र, आज ( २३ मार्च ) देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं.

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सतरावा दिवस आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रवेश केला. महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस एकमेकांना भेटले. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या कानात कुजबूजही केली. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : शिवसेना संसदीय नेतेपदावरून हटवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी…”

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं, “आमची इच्छा तिच होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकत्र आले असते, तर ताकद निर्माण झाली असती. बाकीचे मेलेल पक्ष जिवंत झाले नसते. तसेच, त्यांचा आवाज वाढला नसता. एकत्र असतो, तर शिवसेना प्रमुखांचे विचार पुढं घेऊन गेलो असतो.”

उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र आले, तर शिंदे गटातील आमदारांची नाचक्की होणार? असं विचारलं असता संजय शिरसाट यांनी म्हटलं, “आम्हाला काय अडचण होईल, हे विरोधी पक्षाने पाहू नये. त्यांना सकाळची शपथ घेण्याची संधी मिळणार नाही, याचं त्यांनी भान ठेवावं. आमचं काय जाणार आहे? आमचा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपा शिवसेना एकत्रच आहोत. उद्धव ठाकरे आमच्याबरोबर आले, तर आनंदच आहे.”

हेही वाचा : “…म्हणून वेगळ्या निकालाची अपेक्षा नव्हती,” राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रकरणावर संजय राऊतांनी मांडली भूमिका

ठाकरे-फडणवीस भेटीवर मंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटलं असतं. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल, शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. तर, तुम्ही आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम करा, असं फडणवीसांनी म्हटल्याची चर्चा आहे,” असं शंभूराज देसाईंनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 21:56 IST

संबंधित बातम्या