लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या (दक्षिण) मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी शनिवारी रात्री १.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल अंशत: रद्द केल्या करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

रात्री ११.४९ ची विरार – चर्चगेट, रात्री १२.०५ ची विरार – चर्चगेट, रात्री १२.३० ची बोरिवली – चर्चगेट, रात्री १२.१० ची बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येईल. पहाटे ४.१५ ची चर्चगेट – विरार, पहाटे ४.१८ ची चर्चगेट – बोरिवली मुंबई सेंट्रलवरून चालवण्यात येईल. रात्री ११.३० ची विरार – चर्चगेट लोकल ही चर्चगेटपर्यंत धावणारी शेवटची लोकल असेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.