मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात पादचारी पुलाचे काम वेगात सुरू असून त्या कामामुळे शनिवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल. ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल रात्री ११.१२ वाजताची सीएसएमटी ते ठाणे लोकल सुटेल. त्यानंतरच्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, कर्जत, कसारा दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.

ठाणे स्थानकात सीएसएमटी दिशेकडे फलाट क्रमांक २/३ वर पादचारी पुलाचे चार गर्डर्स लावण्यात येणार आहेत. त्यानिमित्त शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत ५ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत कळवा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धिम्या लोकल चालवण्यात येतील. अप आणि डाऊन लोकल सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा व मुंब्रा स्थानकात थांबतील. ब्लॉकपूर्वी शेवटची सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल वेळापत्रकानुसार धावेल.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
accident in Uran, Two died accident uran
उरणमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू

हेही वाचा >>>मुंबई : मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल रात्री ११.१२ वाजताची सीएसएमटी ते ठाणे लोकल सुटेल. यानंतर इतर सर्व कल्याण, बदलापूर, खोपोली, कर्जत, कसारा टिटवाळा लोकल रद्द केल्या आहेत. ब्लॉकनंतर पहिली अप दिशेकडील लोकल कल्याणहून पहाटे ५.२१ वाजता सीएसएमटीकरिता सुटेल. ब्लॉकनंतर डाऊन दिशेकडील पहिली लोकल सकाळी ६.२३ वाजता विद्याविहारवरून टिटवाळाकरिता सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>>मुंबईत ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, तरीही पाण्याची चिंता नाही; कारण…

पहाटेची कसारा-सीएसएमटी लोकल रद्द

कसारा येथे पॉइंट क्रॉसिंग आणि लँडिंग रेल्वे बदलण्याच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ वाजेपासून ते रात्री १.०५ वाजेपर्यंत दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे शनिवारी रात्री ९.३२ वाजेची सीएसएमटी- कसारा धीमी लोकल टिटवाळापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर पहाटे ३.५१ वाजेची कसारा-सीएसएमटी लोकल टिटवाळा येथून चालवण्यात येईल.