मुंबई : झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडून मालकाचे ६८ लाख रुपये घेऊन नोकराने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातच्या सोने व्यापाऱ्याने मुंबईत धाव घेऊन पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी कामगार रमेश गंगाराम वेद याच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा >>> वांद्रे येथील व्यावसायिकाची ६ कोटींची फसवणूक; सनदी लेखापालासह कर्नाटकात राहणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमधील रहिवासी राजेश चंद्रकांत चोक्सी (४९) यांच्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट रोजी त्यांनी विश्वासू कामगार वेद याला झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडे व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी पाठवले. ठरल्याप्रमाणे झवेरी बाजारातील व्यापाऱ्याने राजेश यांच्याशी बोलणे झाल्यानंतर त्याला ६८ लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर काही वेळाने कामगाराचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. चोक्सी त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. मात्र बेदचा फोन लागत नसल्याने त्यांना संशय आला. अखेर, फसवणूक झाल्याची खात्री होताच त्यांनी गुरुवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण, तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. वेद हा मूळचा राजस्थानमधील रहिवासी आहे.