मुंबई : शिवसैनिकांनी यंदा मेळाव्यापूर्वी कलानगर ते शिवाजी पार्क अशी पदयात्रा काढण्याचे ठरवले आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारी ३ वाजता ही पदयात्रा निघणार  आहे.

शिवाजी पार्क येथे दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित असतात. मात्र यंदा शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसैनिक विविध प्रकारे आपली निष्ठा व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांचा एक गट मातोश्री ते शिवाजी पार्क चालत जाणार आहे. गेली काही वर्षे हा गट अशाच पद्धतीने चालत जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा मात्र या पदयात्रेत वकील, उत्तर भारतीय समाज, उत्तर भारतीय महिला संघ, परदेशातून आलेले शिवसैनिक, भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.  बुधवारी दुपारी ३ वाजता ही पदयात्रा सुरू होणार असून टाळ, मृदुंग, पारंपरिक वाद्य वाजवत शिवाजी पार्कवर जाणार असल्याची माहिती अरिवद भोसले यांनी दिली.