मुंबई : नवी दिल्लीतील कंपनीच्या दोन जहाजांवरील साहित्याचा अपहार करून कंपनीचे सहा कोटींचे नुकसान झाल्याच्या आरोपाखाली शिवडी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हरियाणातील व्यावसायिकाच्या तक्रारीवरून फसवणूक, फोजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा… Maharashtra News LIVE Updates : “शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं”, मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारताच राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याचं मोठं भाष्य

हे ही वाचा… घाटकोपरमध्ये २१ लाख रुपयांचा अनधिकृत गुटखा जप्त, दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार मृदूल थिरानी संचालक असलेल्या किरण रिसोर्सेस या कंपनीने २०१७ साली फ्लोटिंग रेस्टॉरन्टसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये निविदा सादर केली होती. तक्रारीत नमुद केल्यानुसार थिरानी यांच्या कंपनीला जहाज व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे त्यांनी हे काम एका तज्ज्ञ कंपनीला दिले होते. त्यानंतर तक्रारदारांच्या कंपनीने दोन जहाजे आयात केली. ‘सेयाह’ व ‘नेव्हरलँड’ अशी या जहाजांची नावे ठेवण्यात आली. ती दोन जहाज २०१७ मध्ये इंदिरा गेट येथे ठेवण्यात आली होती. तज्ज्ञ कंपनीच्या मदतीने जहाजामध्ये सुशोभिकरण करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये जहाज व्यवस्थापन कंपनीच्या कॅप्टनद्वारे दोन्ही जहाजे कार्यरत झाली. सीमाशुल्क विभागाने २५ नोव्हेंबर २०२० रोजी मेमो जारी केला. त्याअंतर्गत कंपनीला ९ कोटी रुपये दंड ठोठावून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आणि त्यानंतर टाळेबंदी झाली. जानेवारी २०२३ मध्ये तक्रारदारांनी हाजी बंदर येथे जाऊन जहाजांची पाहणी केली असता त्यावरील वातानुकूलित यंत्रणा, सुशोभिकरणाचे साहित्य, ध्वनी यंत्रणा, हायड्रॉलिक पंप, नांगर, सीसी टीव्ही कॅमेरे, बॅटरी आदी वस्तू गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी नुकतीच शिवडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी व्यवस्थापन कंपनीच्या कॅप्टेननासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.