मुंबई : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत | Shivaji Nagar police arrested a criminal who committed burglary mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत

विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली.

मुंबई : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटकेत
संग्रहित छायाचित्र

विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. घरफोडीसाठी वापरण्यात येणारी अवजारे आणि लुटलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला.गेल्या काही दिवसांपासून गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास सुरू केला होता.

हेही वाचा >>> मुंबई : उपमुख्यमंत्री बुधवारी घेणार ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा

पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेराची तपासणी केली असता एक सराईत गुन्हेगार दृष्टीस पडला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. कचराभूमी परिसरात सोमवारी रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना रमझान अली शेख आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील बॅगेची झडती घेतली असता पोलिसांना त्यात काही दागिने आणि रोख रक्कम आढळली. तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी काही अवजारे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“जे राष्ट्रविरोधी काम करतील, त्यांना…” मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली
छोटा शकीलचा साडू सलीम फ्रुटने २५ कोटी रुपयांची इमारत अशी बळकावली…
मुंबईमधील जोडपं Live Stream करत होतं Sex Video; गायकाच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु
अंधेरी गोखले पूल बंद झाल्यास नागरिकांना मेट्रोचा पर्याय ; प्रवासी संख्या किमान २० हजाराने वाढण्याचा अंदाज
बुलेट ट्रेनच्या १३५ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी निविदा; शिळफाटा ते झारोळी मार्गाच्या कामाला गती

व्हिडिओ

ताज्या बातम्या
खळबळजनक! धावत्या लक्झरी बसमध्ये आढळला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह
पुणे: विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
‘गद्दार’ वादावर पडदा, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मनोमिलन; मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधींनी आम्हाला…”
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली