मुंबई : श्रावणमासी चोहीकडे दाटलेली हिरवळ सध्या मनाला ताजेतवाने करते आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे सण आठवड्यावर येऊन ठेपले आहेत आणि त्यात व्रतवैकल्ये, खास श्रावणातले खाद्यपदार्थ यांचीही रेलचेल आहे. इतक्या सगळ्या मनभावन वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी घेऊन आलेल्या ‘लोकसत्ता श्रावणरंग’ कार्यक्रमाचे बिगूल वाजले आहे. ठाण्यात शुक्रवारी ‘श्रावणरंग’ या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधील कलाकार पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर हेही या मनोरंजक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

श्रावण महिन्यातील खाऊ, खेळ, पाऊसगाणी, पावसाच्या कविता, स्पर्धा कार्यक्रम असा धमाल मनोरंजनाचा ठेवा घेऊन आलेला ‘लोकसत्ता श्रावणरंग’ हा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानानजीकच्या कांती विसारिया सभागृहात दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. कार्यक्रमातील पाककला स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांनी दुपारी २.३० वाजता यायचे आहे. या पाककला स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना कांदा लसूण मसाला वापरून बनवलेला श्रावणातील पारंपरिक शाकाहारी पदार्थ आणि श्रावणातील पारंपरिक गोड पदार्थ सादर करायचे आहेत.

या स्पर्धेतील विजेत्यांना ‘सुहाना स्पाईस’तर्फे विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, एका विजेतीला सोनी मराठी वाहिनीवरील ‘आज काय बनवू या? – मधुरा स्पेशल’ या शेफ मधुरा बांचल यांच्या शोमध्ये सहभागी होऊन आपला पदार्थ सादर करता येणार आहे. या स्पर्धेबरोबरच मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, मराठमोळी साजशृंगार स्पर्धा हे या ‘श्रावणरंग’चे खास आकर्षण असणार आहे. यावेळी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना हमखास भेटवस्तू मिळणार आहेत.

मुंबईत ३ ऑगस्ट रोजी ‘श्रावणरंग’

मुंबईत रविवारी, ३ ऑगस्ट रोजी दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात ‘श्रावणरंग’ कार्यक्रम होणार असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील लोकप्रिय कलाकार चेतना भट आणि निखिल बने यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री ऋतुजा बागवे मराठमोळ्या साजशृंगार स्पर्धेची परीक्षक

‘नांदा सौख्यभरे’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या आणि ‘अनन्या’ हे मराठी नाटक ते अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अंधारमाया’ या वेबमालिकेपर्यंत विविधांगी भूमिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ऋतुजा बागवे ‘श्रावणरंग’ या कार्यक्रमात होणाऱ्या मराठमोळ्या साजशृंगार स्पर्धेची परीक्षक आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पारंपरिक पेहराव आणि साजशृंगार करणे अपेक्षित आहे. याशिवाय, कविता / एकपात्री सादरीकरण स्पर्धाही होणार असून त्यात जास्तीत जास्त चार मिनिटांची कविता वा एकपात्री सादरीकरण करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके तसेच इतर सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

घेण्यात येणाऱ्या स्पर्धा

‘श्रावणरंग’ या कार्यक्रमात १८ वर्ष पूर्ण असलेले वा त्याहून अधिक वय असलेले स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत विनामूल्य सहभाग मिळवण्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करता येईल किंवा ९२६६९११४४९ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा. ‘लोकसत्ता श्रावणरंग’मधील विविध स्पर्धांसाठी नियम व अटी लागू असतील.

प्रायोजक चौकट

मुख्य प्रायोजक – सुहाना अंबारी मसाले सहप्रस्तुती – निपॉन इंडिया म्युच्युअल फंड सहप्रायोजक – सोनी मराठी, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड , पितांबरी रुचियाना, सोसायटी टी, एम. के. घारे ज्वेलर्स, ब्रह्मविद्या साधक संघ, रिजन्सी ग्रुप, युनियन बँक ऑफ इंडिया.

पॉवर्ड बाय – वीणा वर्ल्ड , सत्यम फूड्स.

गिफ्ट पार्टनर – कलानिधी, इवाज नेल स्टुडिओ, श्री दिपक साडीज , हॉटेल पार्ले इंटरनॅशनल.

इव्हेंट पार्टनर – मी मंत्रा इव्हेंट्स

पाककला स्पर्धा – परीक्षक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेलिब्रिटी शेफ डॉ. तुषार प्रीती देशमुख, आहारातज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ डॉ. लीना पेडणेकर, सप्रे फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आणि पोषणविशेष डॉ. जान्हवी सप्रे लाडे

कविता /एकपात्री स्पर्धा – कवयित्री नीरजा, संपादक, लेखिका मोनिका गजेंद्रगडकर