मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अप दिशेकडे येणारी लोकल मंगळवारी सकाळी चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंतच धावली. परिणामी, मुंबई सेंट्रलला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांना कार्यालय गाठण्यासाठी द्राविडी प्राणायाम घडला. काही प्रवाशांनी मुंबई सेंट्रलवरून पायपीट करीत चर्चगेट गाठले.

हेही वाचा… धक्कादायक! दादर स्टेशनवर चालत्या ट्रेनमधून महिलेला ढकललं, आरोपीला पोलिसांनी केली अटक

हेही वाचा… मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा दूरध्वनी, पोलीस यंत्रणा सतर्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चगेट स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी ८.५० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप दिशेकडे येणारी लोकल सेवा खोळंबली. लोकलगाड्या चर्चगेटऐवजी मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येत होत्या. यामुळे ग्रॅन्ट रोड, चर्नी रोड, मरिन लाइन्स आणि चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सिग्नल बिघाड झाल्यामुळे, घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी ९.२२ वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणेतील बिघाडाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र त्यानंतरही लोकल सेवा विलंबाने धावत होती. यामुळे अनेकांना कार्यालयात जाण्यात खूप उशीर झाला.