शासनातर्फे २०१४ या वर्षांसाठीच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दोन विभागात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची रक्कम एक लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशी आहे.
पुरस्काराचा प्रकार, नाव, लेखक, कंसात पुस्तकाचे नाव
प्रौढ वाङ्मय (काव्य)- कवी केशवसुत पुरस्कार-मनोहर जाधव (तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात), (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार-विनायक येवले (ठसे बदललेल्या मुक्कामावरून),
प्रौढ वाङ्मय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार -प्रा. मधू पाटील (कामस्पíशता पाच एकांकिका),
(कांदबरी)-हरी नारायण आपटे पुरस्कार : राजन खान (रजेहो ऊर्फ मुद्दाम भरकटलेली कथा)(कादंबरी)-श्री. ना. पेंडसे पुरस्कार- व्यंकट पाटील (घात)
(लघुकथा)-दिवाकर कृष्ण पुरस्कार-विनिता ऐनापुरे (कथा तिच्या), (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार-मनस्विनी लता रवीन्द्र (ब्लॉगच्या आरशापल्याड), प्रौढ वाङ्मय (ललित गद्य-ललित विज्ञानासह)-अनंत काणेकर पुरस्कार-अमृता सुभाष (एक उलट..एक सुलट), (ललित गद्य)-ताराबाई िशदे पुरस्कार-रवी अभ्यंकर (पन्नाशीचा भोज्या),
(विनोद) श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर पुरस्कार-मंगला गोडबोले (त्रतू हिरवट), (चरित्र)-न.चिं.केळकर पुरस्कार-प्रा. निलकंठ पोलकर (ज्ञानसूर्य डॉ. डी.वाय. पाटील), (आत्मचरित्र)-लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार-म.सु.पाटील (लांबा उगवे आगरी),
(समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र, ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार-यशोदा भागवत (ग्राफिक डिझाइनचे गारूड),
(राज्यशास्त्र/समाजशास्त्र)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार-विजय नाईक (साऊथ ब्लॉक दिल्ली शिष्टाईचे अंतरंग), प्रौढ वाङमय (इतिहास)- शाहू महाराज पुरस्कार-डॉ. माया पाटील (शहापूरकर) मंदिर-शिल्पे-मराठवाडय़ातील काही शिल्प आणि मंदिर स्थापत्य,
(भाषाशास्त्र/ व्याकरण)-नरहर कुरुंदकर पुरस्कार-डॉ. सुधीर रा. देवरे (अहिराणीच्या निमित्ताने : भाषा)
(विज्ञान व तंत्रज्ञान),(संगणक व इंटरनेटसह)- महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार-डॉ. निवास पाटील (शोध देवकणाचा), प्रौढ वाङ्मय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) वसंतराव नाईक पुरस्कार-गजेंद्र प्रभाकर बडे (योजनाची विकासगंगा भाग : १ शेतीच्या येजना),
(अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन) सी. डी. देशमुख पुरस्कार-डॉ. जे.के.पवार (अर्थायन), प्रौढ वाङ्मय (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र-ना. गो. नांदापूरकर पुरस्कार-राजीव साने (गल्लत गफलत गहजब)
(शिक्षणशास्त्र)-कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार-मंगला कुलकर्णी (शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे), प्रौढ वाङ्मय (पर्यावरण)-डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार-संतोष िशत्रे (विज्ञानाधारित निसर्ग संवर्धन-संरक्षण)
(संपादित/ आधारित)-रा.ना.चव्हाण पुरस्कार-संपा. अरुणा ढेरे (स्त्री-लिखित मराठी कथा १९५० ते २०१०). प्रौढ वाङमय (अनुवादित)- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार-अनु. वर्षां गजेंद्रगडकर (दोन क्षितिजे), प्रौढ वाङ्मय (संकीर्ण- क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार-सुकन्या आगाशे (मागोवा मिथकांचा), बालवाङ्मय (कविता)- बालकवी पुरस्कार-शं.ल.नाईक (माकडोबाची वरात), बालवाङ्मय (कादंबरी)- साने गुरुजी पुरस्कार- सुरेश वांदिले (बेअर्ड काका), बालवाङ्मय (कथा- छोटय़ा गोष्टी, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार-भा.ल.महाबळ (चोरानं खोकला नेला!), सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार-मंगला नारळीकर (गणित गप्पा भाग एक), (बालङ्मय संकीर्ण) ना.धों. ताम्हणकर पुरस्कार-डॉ. भगवान अंजनीकर (कुशल सारथी-नरेंद्र मोदी),
बृहन्महाराष्ट्र पुरस्कार-सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार-स्मिता भागवत (सावन घन बरसे).