मुंबई : शिक्षक भरती घोटाळय़ात अटक झालेले सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना सत्ताबदल होताच पुन्हा सरकारी सेवेत दाखल करून घेण्यात आले असून, त्यांची नियुक्ती उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे.

राज्यात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळय़ात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकरे यांना अटक करण्यात आली होती. जानेवारी २०२०मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत घोटाळा झाला होता. घोटाळा उघड झाल्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना अटक झाली होती. गेल्या जानेवारीत खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर खोडवेकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या घोटाळय़ाच्या चौकशीत अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांची नागपूर विभागीय आयुक्तपदी तर कल्याण-डोंबिवलीचे माजी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.