इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून पालिकेने झेविअर्स मैदानात बांधलेल्या भूमिगत टाक्यांचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे यंदा पावसाळय़ात या परिसरातला पाणी साचण्यापासून मुक्ती मिळणार का हे समजू शकणार आहे. पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाची यंदाच्या पावसाळय़ात कसोटी लागणार आहे.

मुंबईचा आकार हा खोलगट बशीसारखा असून दरवर्षी सखलभागात पावसाचे पाणी साचते. हिंदमाता परिसरात पावसाचे पाणी बराचकाळ साचून राहते व त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होते. आजूबाजूच्या वसाहतींमध्येही पाणी तुंबते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या. तरीही हिंदमाता परिसरात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न पालिकेला सोडवता आलेले नाही. त्यामुळे पालिकेने गेल्यावर्षी भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपांच्या सहाय्याने परळ येथील झेविअर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणी सोडण्याची ही योजना आहे. त्यापैकी झेविअर्स मैदानात भूमिगत टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

या टाकीपर्यंत पाणी वाहून नेण्याकरिता पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचे काम गेल्यावर्षीच पूर्ण झाले असून नव्याने बांधण्यात आलेल्या विस्तारित टाकीशी अन्य पर्जन्य जलवाहिन्या जोडण्याचेही काम पूर्ण झाल्याचे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मेस्त्री यांनी सांगितले. त्यामुळे यंदा हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रकल्प असा आहे

हिंदमाता परिसरात साचणारे पाणी पंपाच्या सहाय्याने आणून झेविअर्स मैदान व प्रमोद महाजन कला पार्क या ठिकाणच्या भूमिगत टाक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. या परिसरात दीड-दोन तास कोसळणाऱ्या पावसाचे पाणी हे महाकाय टाक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. समुद्राची भरती ओसरल्यावर हे पावसाची पाणी नाल्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. गेल्यावर्षी पालिकेने झेव्हीअर्स मैदानात साधारण १ कोटी लीटरची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. मात्र तरीही पाण्याचा निचरा वेगाने होत नसल्यामुळे यावर्षी या टाकीची क्षमता वाढवण्यात आली असून आता ही क्षमता २ कोटी ८७ लाख लीटर पाणी साठवता येईल इतकी झाली आहे. हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येवरील या उपाययोजनेसाठी १३० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. भविष्यात मिलन सब-वे परिरसारातही अशी भूमिगत टाकी बांधण्यात येणार आहे