करोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीवर आधारित ‘इंडिया लॉकडाऊन’ हा मधुर भांडारकर दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे.करोनामुळे देशभरात लागू झालेली टाळेबंदी आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा बेतली आहे. टाळेबंदीच्या काळात भरडले गेलेले नागरिक, मजुरांची ससेहोलपट या चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न लेखर, दिग्दर्शकांनी केला आहे. ‘झी ५’ या ओटीटीवर वाहिनीवर २ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा >>>रवी जाधव अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बायोपिक बनवणार, पंकज त्रिपाठी साकारणार मुख्य भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे ट्रेलरमध्ये?
देशात मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट आले. त्यामुळे केंद्र सरकारने अचानक २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे नागरिकांनी तारांबळ उडाली. वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. मात्र करोनाच्या भितीमुळे मजूर शहरतून पायी आपापल्या गावी जाऊ लागले होते. हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीचे संकट कोसळले. अनेकांना नोकरीला मुकावे लागले. या सर्व घटना ट्रेलरमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.मधुर भांडारकर यांनी यापूर्वी ‘चांदणी बार’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशन’ आदी चित्रपटांतून समाजातील वास्तव प्रेक्षकांसमोर मांडले. पुन्हा एकदा ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटाच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळातील वास्तव प्रेक्षकांसमोर ते घेऊन येत आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, श्वेता बासू प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.