मुंबईः अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल आला असून याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी अन्यता मी सर्व अमेरिकन वकिलाती उडविन, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे.
वकिलातीला शनिवारी हा ई-मेल प्राप्त झाला. मी अमेरिकेचा कुख्यात नागरिक आहे. माझ्यावर अमेरिकेत १९ प्रकरणे प्रलंबित आहेत. बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी, अन्यथा सर्व वकिलाती उडवून देईन. मी अनेक अमेरिकन नागरिकांना मारण्याचा कट रचला असल्याचेही या ई-मेलमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी स्वतः तक्रार करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस व गुन्हे शाखेच्या मदतीने बीकेसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.