मुंबई : तरुणीच्या हत्ये प्रकरणी तीन महिलांना अटक ; अनैतिक संबंधातून हत्या | Three women arrested in connection with the murder of a young woman Mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई : तरुणीच्या हत्ये प्रकरणी तीन महिलांना अटक ; अनैतिक संबंधातून हत्या

पतीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे घडली.

मुंबई : तरुणीच्या हत्ये प्रकरणी तीन महिलांना अटक ; अनैतिक संबंधातून हत्या
( संग्रहित छायचित्र )

पतीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे घडली. याबाबत नेहरूनगर पोलिसांनी तपास करून तीन महिलांना अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा >>>मुंबई : स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक ; ११ जणांविरोधात तक्रार

कुर्ला कसाईवाडा परिसरातील एका नाल्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती बुधवारी नेहरू नगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. एका गोणीमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. पोलिसांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या परिसरातील काही सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली. यामध्ये एका रिक्षाबद्दल पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या रिक्षाचा शोध घेतला. रिक्षाचालकाने आरोपी महिलांना कामगार नगर येथून माहुल गाव परिसरात सोडल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा >>>बेस्टच्या नोटीसवर कंत्राटदाराचे मौन; मिनी बसची संख्या रोडावली

पोलिसांनी काही दिवस पाळत ठेवून या प्रकरणी मीनल पवार, प्रज्ञा भालेराव आणि शिल्पा पवार या तिघींना कुर्ला परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता मीनलच्या पतीचे या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. चार दिवसांपूर्वी या तरुणीला आरोपी महिलेच्या पतीने माहुल गाव परिसरात राहणाऱ्या शिल्पाच्या घरी ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच आरोपी महिला तेथे पोहोचली. ती तरुणीला इमारतीच्या छतावर घेऊन गेली आणि तेथे तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मैत्रीण आणि बहिणीच्या मदतीने तरुणीचा मृतदेह गोणीत भरून कसाईवाड्यातील नाल्यात फेकून दिला. तिन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अंतर्गत फेरबदलामुळे नव्या वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमता वाढणार

संबंधित बातम्या

‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…
सहकारातील राज्यांचे अधिकार अबाधित
अंधेरीच्या गोखले पुलाबाबत महानगरपालिकेचे आयआयटी आणि व्हीजेटीआयला पत्र
विधानपरिषद निवडणूक: सातपैकी तीन जागांवर काँग्रेसची बाजी; शिवसेनेला दोन जागांवर यश
‘गोमांस बंदीविषयी काही बोललो तर मला नोकरी गमवावी लागेल’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल
BREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू
सातारा: राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढणार-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…
“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा