लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (२ नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर सोमाटणे येथे हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे. या कामासाठी गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहील.

आणखी वाचा-मुंबई : जेट एअरवेज प्रकरणात ईडीकडून ५३८ कोटीच्या मालमत्तेवर टाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे मार्गिकेवरील कुसगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून चाकण लेनने उर्से खिंड वडगाव फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याच्या दिशेने वळविण्यात आली आहे. गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होणार आहे.