धारावी पुर्नविकासाच्या विरोधात शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) वतीनं अदाणींच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे. यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्र डागलं आहे. “५० खोके कमी पडायला लागले, म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे.”

हेही वाचा : “सरकार येतं आणि जातं, तुमचा रेकॉर्ड खराब करू नका”, धारावी मुद्द्यावरून ठाकरेंचं पोलिसांना आवाहन; म्हणाले, “गुंडागर्दी झाली तर…”

“वर्षा गायकवाड यांनी अदाणींना प्रश्न विचारला, तर भाजपा उत्तर देते. नशिब समजा तुमची स्थिती अजून महुआ मोईत्रांसारखी करण्यात आली नाही. महुआ मोईत्रांनी त्यांना ( अदाणींना ) प्रश्न विचारल्यावर निलंबित करण्यात आलं. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे.

हेही वाचा : ‘अदाणींनी मुंबईसाठी काय केले? ‘मोदाणी’ला धारावीचे लचके तोडू देणार नाही’, वर्षा गायकवाड यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धारावीतील संडास, बाथरूम सगळ्यांचा ‘टीडीआर’ अदाणींना देऊन टाकला आहे. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा ‘टीडीआर’ देण्यात आला नाही. कारण, बिनसवलतीच्या ढगांचा पाऊस एवढा पाडला आहे की, आणखी ढगांची गरज नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.