मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रोचे तिकीट उपलब्ध केले असून, आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्ग १ ची तिकिटे थेट उबर ॲपवर उपलब्ध झाली आहेत. यावर्षी दिल्ली आणि चेन्नईमध्ये यशस्वी सेवेनंतर हा उपक्रम मुंबईत राबवण्यात आला आहे.
आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना उबर ॲपमध्येच तिकीट शोधणे, खरेदी करणे आणि वापरणे शक्य झाले आहे.
ॲपमधूनच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत असल्याने प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. हा उपक्रम उबर, मुंबई मेट्रो वन आणि ओएनडीसी नेटवर्क यांच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.
