चाचण्यांतून येणाऱ्या परिणामांच्या निरीक्षणांचे काय?;  डॉक्टरांचा प्रश्न

मुंबई : घरगुती करोना चाचणी संचाबरोबरच (कोविड सेल्फ टेस्ट किट) घरगुती प्रर्तिंपड चाचणी संचही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या संचाची विक्री करोना चाचणी संचाच्या तुलनेत प्रर्तिंपड चाचणी संचाची विक्री खूपच कमी असली तरी या संचाच्या विक्रीवरही आता प्रश्न उपस्थित केला जात आहेत. घरगुती करोना चाचणी संचाच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यात येत आहे, विक्रीची माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना आता प्रर्तिंपड चाचणी संचाच्या विक्रीवरील नियंत्रणाचे काय? या चाचण्यांमधून येणाऱ्या परिणामांच्या निरीक्षणाचे काय? असा प्रश्न केला जात आहे. 

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

घरच्या घरी चाचण्या करता याव्यात, अहवालाची प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी घरगुती करोना चाचणी संचाच्या विक्री आणि वापराला आयसीएमआरने परवानगी दिली. तिसऱ्या लाटेत या संचाचा वापर नागरिकांकडून मोठ्या संख्येने होत आहे. मात्र या संचाचा वापर करणाऱ्यांकडून चाचणीच्या अहवालाची माहिती लपवली जात आहे. त्यामुळे या चाचणीत  बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंदणी होत नसल्याने संसर्ग प्रसाराचा धोका वाढत असल्याचे म्हणत आता या संचाविक्रीसाठी मुंबई महानगर पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, उत्पादक, वितरक, औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडून विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोध घेण्यात येणार आहे. असे असताना आता प्रर्तिंपड चाचणी किटही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी ऑनलाइनही याची विक्री होत आहे. तेव्हा या चाचणी संचाच्या विक्रीवरील नियंत्रणाचे काय? यातुन येणाऱ्या परिणामांच्या निरीक्षणाचे काय, असा प्रश्न महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्र्टिंसग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी केला आहे. यासंबंधी एक ट्विट करत आयसीएमआर आणि आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. 

याविषयी अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. तर मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मात्र याबाबतची माहिती मुंबईतील वितरकांकडून घेण्यात येईल आणि त्यानंतरच याबाबत काही बोलता येईल, असे सांगितले. ’’’

‘प्रश्न उपस्थित करणे मुळातच चुकीचे’  प्रर्तिंपड चाचणी संच मागील सहा ते सात महिन्यांपासून बाजारात उपलब्ध आहे. मात्र याबाबत नागरिकांना तितकीशी माहिती नसल्याने या संचाची विक्री घरगुती करोना चाचणी संचाच्या तुलनेत खूपच कमी असल्याची माहिती ऑल फूड अँड ड्रग लायसन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली. या संचाच्या विक्रीवर काही डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केला असला तरी करोना कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी मात्र करोना चाचणी संच असो वा प्रर्तिंपड चाचणी संच या दोन्हींवर प्रश्न उपस्थित करणे मुळातच चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. या दोन्ही संचाचा वापर नागरिकांसाठी फायद्याचा आहे. फक्त याचा वापर करणाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. चाचणीबाबत माहिती देत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात रुग्णसंख्येत घट

मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्येत शनिवारीही किंचित घट झाली. दिवसभरात ४२,४६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि २३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात ३९,६४६ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,४४१ झाली आहे. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनच्या १२५ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांची संख्या १,७३० झाली.

ठाणे जिल्ह्यात ६,०२९ नवे बाधित

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी ६,०२९ करोना रुग्ण आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला. ठाणे १,८६३, नवी मुंबई १,५१०, कल्याण-डोंबिवली १,०४७, मिरा-भाईंदर ६०४, ठाणे ग्रामीण ३८६, अंबरनाथ १५६, बदलापुरात १२३ रुग्ण आढळून आले.

मुंबईत १०,६६१ नवे रुग्ण, ११ मृत्यू

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असून शनिवारी १०, ६६१ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर दैनंदिन रुग्णसंख्येच्या दुप्पट म्हणजेच २१  हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. मृतांची संख्या मात्र वाढली असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७२२ रुग्णांना रुग्णालायत दाखल करावे लागले असून १११ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला आहे. सध्या १५.७ टक्के रुग्णशय्या व्यापलेल्या  आहेत.