मुंबई मेट्रोची मेट्रो ३ ही सेवा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. ही मेट्रो सेवा म्हणजे कुलाबा बांद्रा सिप्झ. या अॅक्वालाइन सेवेचा वापर प्रवाशांकडून वाढतो आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. पण या ठिकाणी प्रश्न आहे तो मोबाइल नेटवर्कचा.

मेट्रो लाईन ३ ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

मेट्रो लाईन ३ ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. स्टेशनवर सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) टेलिकॉम ऑपरेटर्सकडून थर्ड पार्टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे घेतले आहेत. त्या बदल्यात या कंपन्यांनी सेवा देणं अपेक्षित आहे. पण लोकांना स्टेशन्सवर नेटवर्क मिळत नाही अशा तक्रारी येत आहेत. जिओ, एअरटेल, व्होडाफोन यांच्या सेवांबाबतचं कंत्राट ACES इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलं. पण मेट्रोच्या बोगद्यांमध्ये आणि स्टेशन्सवर नेटवर्क मिळत नाही.

MMRC चं म्हणणं काय आहे?

सर्व दूरसंचार कंपन्या वापरु शकतील अशा न्यूट्रल इन्फ्रास्ट्रक्चर सेवेचं कंत्राट थर्ड पार्टी करण्यात आलं आहे. अशा सेवांचा परवाना डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अर्थात दूरसंचार विभागाकडून मिळवण्यात आला आहे. दरम्यान एअरटेल आणि व्होडाफोन आयडीयाच्या पायाभूत सेवांचा वापर करुन नेटवर्क कार्यरत करण्यात आलं होतं. मात्र एअरटेलने कुठलीही नोटीस न देता मेट्रो स्टेशन्सवरची सेवा बंद केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. तसंच व्हीआय अर्थात व्होडाफोन आयडीया कफ परेड ते सायन्स सेंटर या स्टेशन्स दरम्यान त्यांच्या नेटवर्कचा विस्तार करत आहेत. तसंच बीएसएनएल नेटवर्क कनेक्टिव्हिटीही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांना नेटवर्कबाबतच्या समस्या भेडसावत आहेत.

मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि दूरसंचार कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहेत

समस्येवर उपाय शोधण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यात चर्चा सुरू आहे. पण अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे मेट्रो प्रवाशांचे हाल होत आहेत. तिकीट काढताना यूपीआयचा पर्याय वापरता येत नाही. मेट्रो प्रवासात मोबाईलद्वारे संवाद साधणे अशक्य होते. भूमिगत मेट्रोच्या स्थानकात अथवा भूमिगत मेट्रोत असताना प्रवासी संपर्क क्षेत्राबाहेर जातात. या समस्येवर तातडीने उपाय करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.