लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात शनिवारी शिवाजी नगर पोलिसांनी छापा टाकून तिच्या घरातून दोन बंदूका आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. महिलेला पोलिसांनी अटक केली असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

आणखी वाचा-चेंबूरमध्ये भरधाव मोटारगाडीची दुचाकीला धडक, चार जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिना रेहान खान (वय २४) असे अटक महिलेचे नाव असून ती गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारी आहे. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिच्या घरात छापा टाकून घरातून एक देशी कट्टा आणि एक रिव्हॉल्व्हर हस्तगत केली आहे. तिने हा शस्त्रसाठी कुठून आणला आणि कोणाला देणार होती याबाबत पोलीस तिची चौकशी करत असून अधिक तपास करत आहेत.